राज्यसभा : उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमधून भाजपाचे ११ उमेदवार अविरोध निर्वाचित

BJP Flags

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) ११ उमेदवार अविरोध निवडले गेले. राज्यसभेत आता भाजपाच्या खासदारांची संख्या ९२ झाली आहे. राज्यसभेत ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे.

त्याच वेळी काँग्रेसच्या खासदारांची संख्या कमी होऊन ३८ राहिली आहे. हा काँग्रेसच्या खासदारांचा राज्यसभेतला नीचांक आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये या स्थितीत काही बदल होणार नाही.

कारण, पुढच्या वर्षी राज्यसभेचे फक्त ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. यातले ४ जम्मू-काश्मीर, ३ केरळ आणि १ पाँडिचेरीचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER