आदित्य ठाकरेंना छोटा पेंग्विन म्हणणाऱ्या समितच्या समर्थनार्थ भाजयुमोचे आंदोलन

Aaditya Thackeray

मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांना ट्विटरवर छोटा पेंग्विन (little-penguin ) संबोधणाऱ्या समित ठक्करला भारतीय जनता युवा मोर्चाने पाठिंबा दर्शविला आहे . नागपूरच्या आकाशवाणी चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पेंग्विनचे पोस्टर गळ्यात घालून अनोखे आंदोलन केले. ठाकरे सरकार (Thakeray Govt) महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत असल्याचं आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.

सोशल मीडियावरून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या समित ठक्करला अटक केल्यानंतर त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात आहे. दोऱ्यांनी बांधून न्यायालयात नेले जात आहे, असा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त काही लोकांनाच आहे का असा प्रश्न सुद्धा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. आकाशवाणी चौकात झालेल्या या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे (Janta Yuva Morcha) कार्यकर्ते मोठ्या संख्येने पेंग्विनचे पोस्टर गळ्यात घालून आले होते.

ट्वीटरवर मंत्री आदित्य ठाकरे यांना पेंग्विन तर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार म्हणणाऱ्या समीत ठक्कर या तरुणाला नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे. नागपूर पोलिसांनी 24 ऑक्टोबरला समीत ठक्करला राजकोटमधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबरला न्यायालयाने समीत ठक्करला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यावर परवा संध्याकाळी पुन्हा एकदा समीत ठक्करला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. तेव्हा या प्रकरणात आणखी तपास शिल्लक असल्याच्या पोलिसांच्या युक्तिवादाला मान्य करत न्यायालयाने समीत ठक्करला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही बातमी पण वाचा : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षेंचे नावही चर्चेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER