वारीस पठाण यांच्यावर कारवाई करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी

BJP Youth action against Varis Pathan

सांगली : एम.आय.एम.आय.एमचे नेते वारीस पठाण यांनी आम्ही १५ कोटी, १०० कोटीला भारी पडू असे देशवासीयांच्या भावना दुखावणारे आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून देशवासियांचा अपमान केला आहे. त्याचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली तर्फे तीव्र निषेध करण्यात आला.

धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून तमाम भारतीयांच्या भावना दुखावणारे एआयएमआयएम चे नेते वरीस पठाण यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, त्याच्यावर कारवाई न झाल्यास त्यांच्यावरील कारवाईसाठी युवा मोर्चाला आंदोलन करावे लागेल असे निवासी उपजिल्हाधिकारी सौ मौसमी बर्डे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

युपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने स्विकारली 5 एकर जमीन, मशीदीऐवजी बनणार शिक्षण संस्था

यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे दीपकभाऊ माने, चेतन माडगुळकर, मकरंद म्हामुलकर, अमित देसाई, उदय भडेकर, अंकुर तारळेकर, विश्वजीत पाटील, कृष्णा राठोड, श्रीकांत वाघमोडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.