शिवसेनेसोबत युती केली असती तर भाजप सत्तेत असता : एकनाथ खडसे

Eknath Khadse - Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार आहेत . यापार्श्वभूमीवर त्यांनी एका वृत्तवाहिनीवर संवाद साधला . यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले .

भाजपने (BJP) विधानसभेत योग्य निर्णय घेतला असता तर महाराष्ट्रात (Maharashtra) चित्र वेगळं असतं, राष्ट्रवादी ऐवजी शिवसेनेसोबत युती केली असती तर भाजप सत्तेत असता, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले .

शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी या तिघांकडून मला ऑफर होत्या, पण राष्ट्रवादीत या ठिकाणी विस्ताराला वाव आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला असे खडसे म्हणाले .

भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलं, त्या कालखंडात परिस्थिती फार अवघड होती, आणीबाणी नंतर भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती जनमानसात रुजलेली नव्हती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यावेळी गावागावांत उपेक्षा सहन करावी लागायची. पण सर्वांच्या मेहनतीने भाजपला आज अच्छे दिवस आले. त्याचा मला नेहमी आनंद राहिला आहे, असेही ते म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER