भाजप कार्यकत्यांचाच सरकारवर अविश्वास, कामठीत तणाव

नागपूर: सत्ताधारी भाजप कार्यकत्यांनी त्यांच्याच पक्षाच्या सरकारवर अविश्वास दाखवत, चक्क कायदा हातात घेत,पोलीस ठाण्याच्या आवारातून दुचाकी उचलून आणून बाहेर जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार दिवाळीच्या दिवशी कामठी येथे घडला. दरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.यामुळे येथे तनावाची स्थिती निर्माण झाली होती.

कामठी येथे बुधवारी रात्री एका अल्पसंख्याक समाजातील तरुणाने रँश ड्रायव्हिंग केल्याच्या करणावरून जुनी कामठी पोलिसांनी सदर तरुणाना विरूध्द कारवाई करून दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान सदर तरूणाला का सोडले असा कांगावा करीत भाजपच्या शहर अध्यक्षासह जमावाने चक्क पोलिस स्टेशनवर धडक देऊन वेठीस धरले .व पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली स्टंबाज तरुणाची गाडी बाहेर आणून तोडफोड करीत जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.यामुळे येथे एकच गोंधळ उडून रात्री ऊशिरापर्यंत तणावाचे वातावरण पसरले होते.राज्यत भाजपचे सरकार असताना, भाजप कार्यकत्यांनी पोलिसांवर अविश्वास दर्शविण्याचा प्रयत्न केल्या बद्दल येथे ऊलटसुलट चर्चेला पेव फुटले होते. याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी विवेक मनपानी व त्यांच्या१३साथीदारासह अन्य कार्यकत्यांविरुध्द सरकारी मालमत्तेचे नुकसान,गैरकायद्याची मंडळी जमविण्याचा गुन्हा दखल केला आहे.

वीनायक पु़्ड