भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक आपसात भिडले

BJP - Shiv Sena

बुलडाणा :- आज बुलडाण्यात भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक आपसात भिडल्याचे समोर आले. बुलडाण्याचे शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरून दोघांमध्ये वाद पेटला. याचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला.

आज दुपारी ४ च्या दरम्यान बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात हा प्रकार घडला. आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना नेते विजयराव शिंदे यांच्यासह तीन-चार भाजप कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला.

भाजप कार्यकर्ते हे संजय गायकवाड यांचा पुतळा जाळण्याच्या तयारीने आले होते. त्यावेळी धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी भाजपाला रोखण्याचे प्रयत्न केले. यावरून दोन्ही गटांमध्ये झटपट झाली. या झटापटीत शिवसेना पदाधिकारी विजयराव शिंदे यांना मारहाण केली, असा शिवसैनिकांचा आरोप आहे.

ही बातमी पण वाचा : पोलिसांनी डोकानियांना ताब्यात घेताच भाजप का घाबरला, नेमके कारण काय?; नवाब मलिकांचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button