सिंधुदुर्गात राणेच; जि. प. अध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीला दणका

narayan-rane-and-uddhav-tha

सिंधुदुर्ग : भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार संजना सावंत (Sanjana Sawant) विजयी झाल्यात.

नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपाकडे बहुमत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीच्या मदतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात होते.

आज झालेल्या निवडणुकीत भाजपाकडून संजना सावंत यांना तर शिवसेनेने वर्षा कुडाळकर यांना उमेदवारी दिली होती. भाजपाच्या संजना सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना ३० विरुद्ध १९ अशा ११ मतांच्या फरकाने पराभूत केले. जिल्हा परिषदेमध्ये आज हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा भाजपाचा अध्यक्ष विराजमान झाल्याने जिल्ह्यातील राजकारणावर नारायण राणेंचे असलेले वर्चस्व निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER