वर्धा जिल्ह्यात भाजपची जबरदस्त मुसंडी

BJP

वर्धा : ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे  निकाल (Gram Panchayat election results) सोमवारी सकाळी जाहीर झाले. यात भारतीय जनता पार्टीने (BJP) मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. ५० पैकी २९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे.

काँग्रेसच्या हाती असलेल्या अनेक ग्रामपंचायतींवर यावेळी मतदारांनी भाजपला कैाल दिला आहे. सेलू तालुक्यातील सर्वांत मोठ्या हिंगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे आठ तर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत निघडे गटाचे ७ उमेदवार विजयी झालेत. येळाकेळी ग्रामपंचायतीवर भाजपाचे १२ उमेदवार निवडून  आले आहेत.

हिंगणघाट तालुक्यातील शिरूड ग्रामपंचायतमध्ये भाजपने ९ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. तर ३ जागांवर काँग्रेस विजयी झाली. आष्टी तालुक्यात पोरगव्हाण ग्रामपंचायतीत ६ जागांवर भाजप तर काँग्रेस ३ जागांवर विजयी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER