चूक त्या महिलांचीच! मुंडे, शेख, वाघमारे, राठोड बिच्चारे निरागस; भाजपाच्या महिला आमदारांचा ठाकरे सरकारला टोमणा

BJP women MLAs scoff at Thackeray government

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या चीड निर्माण करणाऱ्या घटना उघड झाल्यात. काही घटनात तर मंत्री आणि महाआघाडी सरकारमधील नेत्यांची नावे आलीत. पण, सरकारने हे सर्व दडपण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न केलेत. यावरून भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांनी – चूक त्या महिलांचीच! मुंडे, शेख, वाघमारे, राठोड बिच्चारे निरागस, असे ट्विट करून ठाकरे सरकारला (Thackeray government) टोमणा मारला.

श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी ट्विट केले – पूजा चव्हाणने आत्महत्या केली, हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या ‘त्या’ महिलेने गर्मी होत होती म्हणून झगा काढून ठेवला होता. ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे, मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन, लतादीदी, अमिताभ, अक्षयकडून आहे, असं शब्दात महाले यांनी संताप व्यक्त केला आहे.

यात श्वेता महाले यांनी मनसुख हिरेन मुत्यू प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाईपर्यंत सर्व पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. मग कुठलीही यंत्रणा लावा फार काही निष्पन्न होणार नाही.

महाले यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या ट्विटवर नेटीजन्सने प्रतिक्रिया देत सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

ही बातमी पण वाचा : हे शिवसैनिकांचे नव्हे, ‘मातोश्री’चे राज्य; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER