भंडारा जिल्ह्यातील साकोलीत भाजपची सत्ता

BJP

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली नगरपालिकेत भाजपचा कमळ फुलला आहे. या नगरपालिकेत भाजपची सत्ता आली असून १७ पैकी १२ जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा, काँग्रेसला १ जागा आणि अपक्ष १ जागांवर निवडून आले आहेत.

याशिवाय भाजपच्याच धनवंतरा राऊत या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या आहेत.