मराठा आरक्षणासाठी भाजप पुरजोर प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील

Maratha Reservation-Chandrakant Patil

पुणे :- मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाटत असेल. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, अशी सावरासावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी आपले व्यक्तिगत मत मांडलं आहे. विनायक मेटे (Vinayak Mete) यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून एक नागरिक म्हणून सहभागी होतील. मराठा आरक्षणासाठी भाजप पुरजोर प्रयत्न करेल असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर फार सविस्तरपणे बोलणे टाळले. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ब्राह्मण समाजासाठी अमृत महाडमंडळाची स्थापना केली. पण ते अजूनही सुरुच झालेले नाही. यामध्ये सरकारच्या दुरदृष्टीचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना यासाठी अनेक पत्र पाठवण्यात आली. मात्र, यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. ब्राह्मण समाजातील एक वर्ग हा मोठ्याप्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होते पण महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध होत नाही. तसेच सध्या खासगी रूग्णालयात कुठे ही एकच दर आकारले जात नाहीत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “सप्टेंबर पर्यंत ४५ कोटी लस निर्मिती होईल, असा अंदाज आहे. सध्या शहरातील जो वंचित घटक आहे. अशा व्यक्ती करिता शहरातील आमदार, नगरसेवक यांनी आपल्या भागातील किमान दोन रुग्णालयात हजार लस उपलब्ध करून द्याव्यात, असा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे पाटील म्हणाले.

तसेच, करोनाचा विचार करून वेगवेगळ्या स्वरूपात दहावी, बारावीची परीक्षा झालीच पाहिजे. असं म्हणत, सध्या हम करे सो कायदा असं सरकारचं धोरण आहे. अशी टीका देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button