भाजपच विजयाचा गुलाल उधळणार; २० हजारांच्या मताधिक्क्याने जिंकणार, अवताडेंचा दावा

Maharashtra Today

पंढरपूर : मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा (Pandharpur- Mangalvedha Assembly)मतदार संघातील रखडलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्यासाठीच मतदार संघातील मतदारांनी माझ्यावर व भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून मतदानाचा हक्क बजावला आहे. पोटनिवडणूकीत किमान २० हजारांच्या विजयी मताधिक्क्याने मी निवडून येणार आहे, असा दावा भाजपचे (BJP)उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Awatade)यांनी बोलताना केला.

पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी शनिवारी (ता. १७) मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत तब्बल ६६.१५ टक्के मतदान झाले. मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विजयाचा गुलाल आपणच उधळणार असल्याचा दावा केला. आवताडे म्हणाले की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणुक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवण्यात आली. मागील अनेक निवडणुकांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतीसाठी पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळेच येथील मतदारांनी भारत भालकेंवर विश्वास ठेवून तीनदा निवडून दिले होते. परंतु या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही. पुन्हा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या भागाला पाणी देवू असे सांगितले.

याचवेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनाही या भागाचा दौरा करुन केंद्र सरकारच्या निधीतून पुढील तीन वर्षात ही अपूर्ण योजना पूर्ण करु असे आश्वासन दिले. फडणवीस यांच्यावर येथील मतदारांनी विश्वास ठेवून भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदार संजय शिंदे यांच्या विषयी विचारले असता, ते म्हणाले की, आमदार संजय शिंदे यांनी औपचारिकता म्हणून त्यांनी आपली भूमिका पार पडली. त्यांच्यामुळे असा कोणताही फरक पडला नाही. मंगळवेढा तालुक्यातील मतदारांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल, असा ठाम विश्वास आवताडे यांनी व्यक्त केला.

पंढरपूरमध्ये भाजप आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ मेहनत घेतली. त्यामुळे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून मतदानाची टक्केवारी वाढली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील प्रभावीपणे प्रचारयंत्रणा हाताळली. त्यांचीही मला मोठी मदत झाली. सिध्देश्वर आवताडे यांच्यामुळे फटका किती बसेल या विषयी ते म्हणाले, निकालानंतर आपल्याला शीफ़्ट होईलच, त्यांची उमेदवारी मी फारसी मनावर घेतली नाही. मंगळवेढा शहर व तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. २ मेच्या निकालात माझा विजय निश्चित आहे, विजयाचा गुलाल भाजपचेच कार्यकर्ते उधळतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button