भाजपवाले भविष्यात देशाचा हिंदुस्थानऐवजी ‘कमलास्थान’ असा उल्लेख करतील; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुंबई :- महाराष्ट्रात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला भाजपाचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) यांनी घेतलेला एक निर्णय चांगलाच चर्चेत आला आहे.

फळाला ड्रँगन शब्द वापरणं चांगलं नाही. ‘ड्रॅगन’ हे फळ कमळासारखं दिसतं. त्यामुळे या फळाला नाव संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आले आहे, असे सांगून मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली.

या निर्णयाची खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी उडवली आहे. ‘ड्रॅगन फ्रुट’ या फळाचं गुजरात सरकाराने नाव बदलून ‘कमलम’ असे नाव दिलेले आहे. आता भारतीय जनता पार्टीने स्वतःची ब्रँडिंग ही फळांवरसुद्धा करण्यास सुरुवात केलेली दिसते. भविष्यात हिंदुस्थानऐवजी कमलास्थान असा उल्लेख करतील की काय अशी शंका मनामध्ये निर्माण होते, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : आमदार निलेश लंकेंनी जेथे सभा घेतली ती ग्रामपंचायत पडली ;  भाजप नेत्याची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER