शेतकरी आंदोलनामुळे भाजपला राजकीय फायदाच होईल : आ. चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर : दिल्लीतील आंदोलन हे शेतकऱ्यांचे नाही तर शेती विक्रीमाल विक्रीत मध्यस्थी करणाऱ्यांचे आहे. कृषी कायद्याबाबत पंजाब वगळता देशभरातील शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरला नाही. विरोधकांना वाटते तशी राज्यात ठिणगीही पडणार नाही.

तरीही देशभरातील शेतकऱ्यांची कायद्यात काही बदल करण्याची सूचना असल्यास तसे बदल होतील. पण कायदे रद्द होणार नाहीत. शेतकरी जोखडातून मुक्त होणार असल्याने या आंदोलनामुळे भाजपचा कसलाही राजकीय तोटा होणार नाही, उलट फायदाच होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आ. पाटील म्हणाले, १९९५ साली युती शासन काळात साखर कारखान्यांना उसाची झोन बंदी गोपीनाथ मुंडे यांनी उठवल्यानंतर कारखानदारांनी असाच विरोध केला होता. २०१७ साली बाजार समित्याबाहेर शेतकऱ्यांना मालविक्रीचा कायदा केला. त्यावर १५ दिवस बाजार समित्या बंद ठेवून विरोध केला होता.

याचा शेतकऱ्यांना मोठा फायदाच झाला. दिल्लीतील आंदोलकांशी चर्चेतून दोन-तीन विषयांवर सकारात्मक निर्णय होत आहे. पंजाब-हरियाणा वगळता महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, काँग्रेसचे राज्य असलेल्या राज्यस्थानमध्येही आंदोलन नाही. पंजाबमध्ये शेतकऱ्याने माल विकल्यानंतर आठ टक्के सेस द्यावा लागतो. या सेसचे हे सगळे राजकारण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER