…तर भाजपला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही – जयंत पाटील

Jayant Patil

पुणे :- महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात आगामी विधानसभा निवडणुका लढल्यास भारतीय जनता पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर पाटील यांनी उत्तरे दिली. भारतीय जनता पक्षाला हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. आता भाजपने मिशन मुंबईचा नारा दिला आहे.

त्याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद आपल्या सर्वांना दिसून आली. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढली, तर भाजपचे ५० आमदारसुद्धा निवडून येणार नाहीत. राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते, काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, याबाबत विचारमंथन करण्याची गरज आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

ही बातमी पण वाचा : काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार नंतर राज्य सरकार पाडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER