भाजपा कुणाच्या जाण्याने सम्पणार नाही – गिरीश महाजन

Girish Mahajan-Eknath Khadse

पाचोरा : भाजपा व्यक्तिकेंद्रीत पक्ष नाही. विचारावर चालणारा पक्ष आहे. मी गेलो म्हणून संपले असे होत नाही. जाणारे जातात पण कुणाच्या जाण्याने काहीच संपत नाही, असा टोमणा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना मारला.

पाठीत खंजीर खुपसण्याची आमची संस्कृती नाही. ज्यांची ती संस्कृती आहे; तेच तशी भाषा करतातअशी टीका त्यांनी खडसेंवर केली. ते पाचोरा येथे भाजपाच्या कार्यालयाच्या उद्धघाटन कार्यक्रमात बोलत होते. महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले – भाषणे देऊन आणि ऑनलाइन संवाद साधून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत याचे सरकारने ठेवावे. राज्यात पहिल्यांदाच निष्क्रीय आणि बेजबाबदार सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणे घेणे नाही.

ही बातमी पण वाचा : फडणवीस यांच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना डोक्यावर घेतले आहे – प्रसाद लाड यांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER