खडसे गेल्यामुळे भाजपाचे काहीही अडणार नाही – रावसाहेब दानवे

Eknath Khadse - Raosaheb Danve

मुंबई : काही वर्षांपूर्वी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचे कसे होणार, असा प्रश्न अनेकांना पडायचा. भाजपामध्येही अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला जायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्यामुळे भाजपा थांबलेला नाही, असा दाखला देऊन भाजपाचे (BJP) माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सूचित केले की, खडसे पक्ष सोडून गेल्याने भाजपाचे काहीही अडणार नाही.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना दानवे म्हणालेत – एका नेत्याच्या जाण्याने पक्ष कधीच थांबत नाही. भाजपाकडे कार्यकर्त्यांची फळी आहे असून, खडसेंच्या नेतृत्त्वाची पोकळी भरुन निघेल.

उत्तर महाराष्ट्रात भाजपाकडे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची उणीव भरुन काढणारे नेते आहेत. जळगावात आमच्याकडे रक्षा खडसे (Raksha Khadse), सुरशे भोळे आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासारखे नेते आहेत. नाशिक व अहमदनगरमध्येही आमच्याकडे सक्षम नेतृत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता वाटत नाही. आम्हाला चिंता आहे ती नाथाभाऊंनी पक्ष सोडल्याची, मात्र आता त्यांनी निर्णय घेतल्याने हा विषयही संपला आहे.

… मुख्यमंत्रीपद म्हणून गेले असावे

पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचे कारण सांगून त्यांनी ते नाकारले. भविष्यात सत्ता येईल की नाही, असे नाथाभाऊंना वाटले. त्यामुळेच त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले असावे, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER