… भाजपाला पळता भुई थोडी होईल, काँग्रेसच्या नेत्याची धमकी

Sachin Sawant

मुंबई : सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष विरुद्ध भाजपा असा सामना रंगलेला आहे. अंबानी प्रकरणापासून भाजपा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपाचे नेते सतत ठाकरे सरकारविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडणे सुरू आहे. या हल्ल्याला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी उत्तर दिली – आम्ही तोंड उघडले तर भाजपाची पळता भुई थोडी होईल.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. बदल्यांसाठी पैसे घेणारं रॅकेट सक्रिय होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. काँग्रेसनंही राज्यातील राजकीय परिस्थितीवर विचारमंथन केले.

सचिन सावंत म्हणालेत, काँग्रेस नेत्यांनी काल राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपाची सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेली थेर आम्ही पाहत आहोत. संवैधानिक पदांचा दुरुपयोग व संवैधानिक मर्यादांचे उल्लंघन करणे सुरू आहे, यावर आमचे लक्ष आहे. भाजपाच्या षडयंत्राची आम्हाला माहिती आहे.

सचिन वाझे गँगने हजार कोटी रुपयांची वसुली केली. पैसे कुठे गेले याची चौकशी एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, कंपनी मंत्रालय आणि आयकर विभागानं करण्याची आवश्यकता आहे, असे सोमय्या म्हणाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात केंद्राच्या आणखी तपास यंत्रणा लक्ष घालू शकतात. तसे झाल्यास या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER