महाराष्ट्रात लवकरच भाजपा सत्तेत येईल, रामदास आठवलेंचा दावा

Ramdas Athawale

मुंबई :- काँग्रेस महाविकास आघाडीवर नाराज असल्याने ते लवकरच सत्तेतून काढता पाय घेतील. आणि महाराष्ट्रात लवकरच भाजपा (BJP) सत्ता स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी सातारा येथेव्यक्त केला. रामदास आठवले मागील दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर होते शनिवारी त्यांनी वाई व महाबळेश्वर येथे भेट दिली. त्यानंतर रविवारी ते सातारा येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड अण्णा वायदंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आठवले म्हणाले, हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत आम्हाला साशंकता आहे. काँग्रेसला सरकारमध्ये पाहिजे तेवढा सन्मान मिळत नाही, त्यामुळे तो पक्ष महाविकासआघाडी बरोबर किती दिवस राहणार हे सांगता येत नाही. काँग्रेसने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्यास महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळेल असं देखील त्यांनी बोलून दाखवलं. बाळासाहेब ठाकरे यांना जे जमत नव्हतं. तेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी केले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पक्षाला वारंवार विरोध केला त्या पक्षासोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मतभिन्नता असलेल्या पक्षांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या कारभारावर काँग्रेस देखील नाराज असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसने जर सरकारचा पाठिंबा काढला तर महाविकास आघाडीचे सरकार पडू शकते, असे आठवले म्हणाले.

तसेच, भाजपाच्या संपर्कात राज्यातील अनेक आमदार आहेत. भाजपाला सत्तेवर येण्यासाठी २८ आमदारांची गरज आहे. निवडणूक टाळण्यासाठी राज्यातील अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल.” असे रामदास आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, शिवाजी पार्कात मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाच्या दरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतो, असं उत्तर दिलं होतं. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजे, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.

राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे. राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER