राज ठाकरे यांच्या ‘त्या’ पत्रातील भूमिकेचे भाजपाने केले स्वागत

Sudhir Mungantiwar - raj thackeray

मुंबई : कोरोनोत्तर (Corona) महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे भारतीय जनता पार्टीने (BJP) स्वागत केले.

नाणार आणि कोकणच्या विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून राज्याच्या विकासाच्यासाठी दीर्घकालीन हिताचे निर्णय घ्या, असे आवाहन केले आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेचे स्वागत करताना माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणालेत की, राज ठाकरे यांची भूमिका राजकारणाच्या पलीकडची असून महाराष्ट्राला शक्तिशाली करण्याकरिता आहे. असे प्रकल्प राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत. उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाकरिता परवानगी द्यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER