दुधासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपला पवारांकडून उत्तर, थेट पोहचले गायीच्या गोठ्यात

BJP - Sharad Pawar Visits Cow Shed

पुणे : दूध उत्पादक संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने राज्यभरात दूध दरवाढीच्या मागणीसाठी आज राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्या(BJP) नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. एकीकडे राज्यभर आज दूध आंदोलन पेटलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार(Sharad Pawar) मात्र या आंदोलनावर टीकाटीपण्णी न करता सडेतोड उत्तर दिल. दूधाबद्दल खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते थेट आंबेगाव तालुक्यातील गायींच्या गोठ्यातच पोहोचले.

कोरोनाची(Coronavirus) पार्श्वभूमी असताना काही निवडक नेत्यांसह त्यांनी पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथील भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड व पराग उद्योग समूहाला भेट देऊन दूध व्यवसायातील अडचणी आणि उत्पादकता वाढीसाठी काय करता येईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पराग उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, प्रीतम शहा उपस्थित होते.

“शेतकऱ्याला जर दूध धंद्यात टीकायचं असेल तर शेतकऱ्यांनी एकीकडे गायीचं दूध वाढवण्यावर आणि वाढलेल्या दुधावर प्रोसेसिंग करण्यशिवाय पर्याय नाही. उत्पादकता वाढली तर दूध धंद्याला स्थिरता येईल” असं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं. बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा “सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर डेअरी” हा प्रकल्प उभा राहात असून त्यात शेतकऱ्यांच्या संकरित व होस्टेन जातीच्या दुभत्या गायींची दूध क्षमता वाढवण्यासाठी आणि दुभत्या जनावरांमधील संशोधन करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे.

त्या अनुषंगाने शऱद पवार आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथील भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड या गायींच्या गोठ्यामध्ये गायींचे संगोपन व व्यवस्थापन या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दुपारी खाजगी दौऱ्यावर मंचरला आले होते. मात्र यावेळी माध्यमांशी बोलण्याचे त्यांनी टाळले आणि ते पुण्याकडे रवाना झाले.

त्यानंतर पवारांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. सीरम इन्स्टिट्यूट ऑक्स्फर्डसोबत मिळून कोरोनावरील प्रतिबंधक लस तयार करत आहे. या लसीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी ही भेट दिली. लोकांना परवडणाऱ्या दरात ही लस भारतात उपलब्ध होणार आहे अशी माहिती अदर पुनावाला यांनी पवारांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER