२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० पेक्षा जागा जिंकायच्या आहेत : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (2024 Lok Sabha elections) भाजपाने (BJP) आतापासून प्रयत्न सुरू केल्याचे  बघायला मिळत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना येत्या २०२४ च्या निवडणुकीत तब्बल ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा देशभरात जिंकायच्या आहेत, असा दावा केला आहे.

त्याचसोबत देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांचे बहुमत असताना ४०० जागा का, असा प्रश्न पडू शकतो; पण काही कायदे असे आहेत ज्यासाठी संसदेत पक्षाला तीन चर्तुर्थांश बहुमताची गरज पडते.  म्हणून भाजपाला ३० कोटी मतं लागतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकांची मदत करत असताना जास्तीत जास्त मतं भाजपाच्या कमळ चिन्हासोबत कशी जोडता येतील यासाठी कामाला लागावे, असे आवाहन चंदक्रात पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले, याबाबत ईटीव्हीने बातमी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER