औरंगाबादमध्ये भाजपविरुद्ध भाजप! खासदार कराड यांच्या मुलांची कार्यकर्त्याला मारहाण

BJP Bhagwat Karad Son Fight

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे . तर दुसरीकडे येथील राजकारणही चांगलंच तापले आहे. आमच्या वॉर्डात का काम करतोस? असा सवाल करत भाजपा खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी भाजपाच्याच कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भागवत कराड यांच्या मुलांनी भाजपा युवा मोर्चाचा सदस्य कुणाल मराठे या तरुणाला त्याच्या घरात घुसून मारहाण केली. या मारहाणीत कुणाल मराठेच्या घरातील महिलांनादेखील धक्काबुक्की करण्यात आल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादमधील कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात काल रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समता नगर परिसरात काल कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर कुणाल मराठे या कार्यकर्त्याने परिसरात सॅनिटायझरची फवारणी केली. याबाबत भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली, असा दावा कुणाल मराठे या तरुणाने केला आहे. दरम्यान, या घटनेतून भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER