आग्रा नगरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ हा ऐतिहासिक निर्णय देशासाठी अभिमानास्पद : उदयनराजे भोसले

Chhatrapati Shivaji Maharaj - Udayanraje Bhosale

मुंबई : भाजपा (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे आभार मानले आहेत.

उदयनराजे भोसले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेऊन अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्रा नगरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ स्थापण्याचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनापासून अभिनंदन.”

दरम्यान आग्र्यामध्ये मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. पण या संग्रहालयाचे नाव बदलण्यात येत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय.  आग्य्रामधील संग्रहालयास  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर हे संग्रहालय बांधण्यात येत आहे. सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER