वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजपचा आक्रमक पवित्रा;अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

नागपूर : वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे . मात्र याच मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अमरावतीहून नागपुरात येत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न नागपुरातील वाडी परिसरात केला. गाडी अडवल्यानंतर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना वीजबिलासंदर्भात निवेदन देण्याचाही प्रयत्न केला.

माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावतीहून बैठक आटोपून नागपूरला परत येत होते. यावेळी, अजित पवार यांचा ताफा वाडी परिसरात असल्याचे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील वाडी येथे अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, यावेळी पवार यांचा ताफा आडवून त्यांना वाढीव वीजबिलासंदर्भात निवेदन देण्याचा प्रयत्नही युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER