एका आठवड्यात एसटी कर्मचा-यांना वेतन द्या ; भाजपचा सरकारला इशारा

BJP Flags

मुंबई : येत्या एका आठवड्यात एक लाख एसटी कर्मचा-यांचा पगार द्या असा अल्टीमेटम भारतीय जनता पार्टीच्यावतीने (BJP) महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

पुढील आठ दिवसात जर एसटी कर्मचार्‍यांना वेतन दिले गेले नाही तर, राज्यबरात आंदोलन करू असा इशारा विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला आहे.

दरेकर म्हणाले, भाजपा कार्यकर्ते एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी खंबीर ऊभे आहेत.

एका आठवड्यात या एसटी कर्मचा-यांचे पगार दिले नाही तर, राज्यभरातील एसटी डेपोत आंदोलन उभारणार असा इशारा विधानपरिषदेचेे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

एसटी कर्मचा-यांच्या वेतनासंबंधी व अन्य मागण्यांच्या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी एसटी प्रबंधक शेखर चन्ने यांची भेट घेतली. चन्ने यांनी एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांविषयी त्यांना सांगितले. यावर चर्चा केली.

यावेळी भाजपा आम आमदार राहुल नार्वेकर, कार्यकर्ते प्रतिनिधि चंद्रकांत राणे, मनोहर नारकर, बीडी पारले उपस्थित होते.

कोरोना महामारीत जे सेवा देत आहेत अशा एसटी कर्मचा-यांविषयी राज्यसरकारला काही घेणे देणे नाही अशी टीका प्रविण दरेकर यांनी यावेळी केली.

दरेकर म्हणाले की आम्ही राज्य सरकारच्या एसटी महामंडळासाठी 2 कोटींची मदत मागतो आहोत जर सरकारने एक हजार कोटीची जरी मद केली तर किमान एसटी कर्मचा-यांचा पगाराचा प्रश्न सुटू शकेल. दरेकर यांनी स्पष्ट केले की, एका आठवड्याच्या आत जर सरकारने एसटी कर्मचा-यांचे पगार केले नाही तर भाजपा राज्यभर तीव्र आंदोलन करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER