भाजपचे फसव्या कर्जमाफी विरोधात कोल्हापुरात धरणे आंदोलन

Kolhapur - BJP

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले.

विनाअट कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच सतरा प्रकारच्या अटी लावून शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी यावेळी केला.

दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी : रामदास आठवले

सकाळी अकराच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरु केले. “सातबारा कोरा झालाच पाहीजे” “फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो” , अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव आदींनी भाषणातून फसव्या कर्जमाफीबद्दल सरकारवर टिका केली.

दरम्यान राहुल चिकोडे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन दिले. आंदोलन महापालिका विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, दिलीप मैत्राणी, माणिक पाटील-चुयेकर, डॉ. सदानंद राजवर्धन, आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.