भाजपकडून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात धरणे आंदोलन

BJP - Uddhav Thackeray

रायगड : भाजपकडून (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने भाजप घोटाळ्याचे आरोप करत आहे. मुख्यता भाजपचे नेते किरीट सोमय्याकडून मुख्यमंत्र्याना लक्ष्य केले जात आहे.

आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरलई येथे जमीन घोटाळा (Korlai Land Scam) केल्याचा आरोप करत भाजपने केला आहे. याच मुद्द्याला घेऊन भाजपतर्फे ठाकरे यांच्या विरोधात आज (बुधवारी) अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सहभागी होतील. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. तशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने यापूर्वी अनेक गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोरलई येथील 10 कोटी किमतीच्या जमिनीची माहिती दडवल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात दिलेली माहिती आणि कोरलई येथील कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ही बाब समोर आल्याचे त्यांनी म्हटले. सोमय्या यांनी याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच तक्रार केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER