भाजपा साजरा करणार “अटल-गीता” जयंती कार्यक्रम

Acharya Tushar Bhosale - Atal Bihari Vajpayee

मुंबई : श्रीमद्भगवदगीतेचे सामुदायिक पठण आयोजित केले जाणार. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी हा कार्यक्रम जाहीर केला.

अटल-गीता जयंती
दि. २५ डिसेंबर २०२० रोजी भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीदिनीच “गीता जयंती” आली असल्याने , हा सुवर्णयोग आपण सर्वांनी साजरा करावा. आपले पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जी नेहमी सांगत असतात की, “मेरे पास दुनिया को देने के लिए गीता से बढकर कुछ नहीं है और दुनिया के पास भी पाने के लिए इससे बढकर कुछ नहीं है ।” म्हणुनच या दिवशी आपण सर्वांनी पुढील कार्यक्रम करण्याचे आवाहन भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी च्या वतीने करण्यात आले आहे .

1) श्रीमद्भगवदगीतेचे पूजन करावे.
2) श्रीमद्भगवदगीतेचे सामूहिक गीता पठन करावे.
3) भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी किमान ५ जणांना श्रीमद्भगवदगीता सप्रेम “भेट” द्यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER