मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजपा आणणार अविश्वास ठराव

Kishori Pednekar

मुंबई : कोविड-१९ च्या (COVID-19) अव्यवस्थेवरून मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात भाजपा (BJP) अविश्वास ठराव आणणार आहे. यासाठी सभागृहाची बैठक तातडीने बोलवा, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने महापौरांना लिहिले आहे. मुंबईत (Mumbai) कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने अनेक वस्तूंची जास्त दरात खरेदी केली. याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण त्याकडे कुणी लक्षच देत नाही, असा भाजपाचा आरोप आहे. मनमानी कारभार करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक घ्या, अशी मागणी वारंवार करण्यात येते आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. याबाबत इतर पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

मातोश्रीच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात कारवाई का नाही?
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वांद्रेतील पाली हिल मार्गावर असलेल्या बंगल्याचे बेकायदेशीर बांधकाम बुधवारी पाडले. मुंबई हायकोर्टाच्या स्थगितीआधीच बीएमसीने कंगनाच्या घराचे अतिक्रमण पाडले. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली, असा आरोप करून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला की – मातोश्रीच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात कारवाई का केली नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER