मनसेत इनकमिंगचा धडका ; डॅशिंग नेते अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मेगाभरती’

bjp-teacher-volunteers-join-mns-ashok-murtadak-joins mns

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसेत (MNS) इनकमिंगचे वारे वाहू लागले आहे . नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या नेतृत्वात भाजपसाठी काम केलेल्या काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.

नाशिकमधील शिक्षकांच्या एका समुदायाने मनसेत प्रवेश केला. आधी हे शिक्षक भाजपसाठी कार्यरत होते. तसेच येवल्याच्या मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारीही आज मनसेत दाखल झाले. येत्या काळात नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त मनसेचे नगरसेवक निवडून आणू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये झंझावात सुरु होईल, अशी प्रतिक्रिया अशोक मुर्तडक यांनी दिली.

ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी आदल्याच दिवशी (दहा फेब्रुवारी) मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचा भरणा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER