शरद पवारांमुळे राजकारणाचे केंद्र पुणे असल्याचे म्हणत राऊतांनीच मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला ; भाजपचा टोला

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे पुण्याला असल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आरसा दाखवला, असा टोला भाजपच्या मीडिया सेलचे नेते अवधूत वाघ यांनी लगावला .

वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा मुंबई हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता शरद पवार यांच्यामुळे तो पुणे झाला आहे, असे बोलून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला, असे ट्वीट अवधूत वाघ यांनी केले आहे.

दरम्यान पुण्यात श्रमिक पत्रकार संघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले , शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतात असाच आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : काश्मीरात आता जमीन खरेदी शक्य, पण तिरंगा फडकेल का?; संजय राऊतांचा मोदी सरकारला ‘रोखठोक’ सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER