कोल्हापुरातील महामोर्चात भाजपच टार्गेट

BJP

कोल्हापूर : सीएए आणि एनआरसी विरोधात कोल्हापुरात सोमवारी महामोर्चा काढण्यत आला. संविधान बचाव कृती समितीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामोर्चात राजकीय पक्षाचे नेते सहभागी झाले नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची मोर्चेकऱ्यांना आतून मोठा पाठींबा आणि सहकार्य होते. मोर्चेकऱ्यांनीही भाषणातून अनेकवेळा सीएए आणि एनआरसी विरोधात भाजपवर निशाना साधला.मोर्चासाठी भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांनी पाठींबा दिल्याचे संयोजकांनी अनेकवेळा आवर्जून सांगितले.

महापोर्टलबाबत सतेज पाटलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

केंद्र शासनाने आणलेल्या सीएए कायद्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. मूख्यमंत्र्यांनीही भूमीका स्पष्ट करावी, अशीही भूमिका मोर्चेकरी मांडतील अशी अपेक्षा होती.मात्र विधानसभेत या कायद्याला विरोध करावा, यामागणीपलिकडे मोर्चेकऱ्यांनी राज्य शासनाचा उल्लेख टाळला. मोर्चाचा रोख भाजप विरोधी असाच होता, मोर्चात सर्वपक्षीय आणि सर्वधर्मियांचा सहभाग असल्याचा दावा केला असला तरी हिंदूत्ववादी आणि शिवसेनेसह बहूसंख्य कोल्हापूकरांनी मोर्चाकडे पाठफिरविल्याचे चित्र होते.