अज्ञानी काँग्रेस आघाडीचा पळपुटेपणा उघड : भाजप ताराराणी आघाडी

kolhapur-mahanagarpalika

कोल्हापूर : महापौरांनी चोरून सभागृहात येणे आणि भाजप ताराराणीची (BJP Tararani Aghadi) तहकूबिची सूचना न वाचता केंद्र सरकारचा निषेध करणे हे हास्यास्पद आणि महापौर पदाला अशोभनीय आहे. सत्ताधारी आघाडीला केंद्र सरकारचा निषेध सभा चालवूनही करता आला असता. असे न करता झालेला हा प्रकार सभागृहाच्या पवित्र्यास गालबोट लावणारा आहे.

महानगरपालिकेची आज महासभा आयोजित केली होती. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाचा निषेध करून सदर सभा तहकूब करावी, अशी सूचना भाजप ताराराणी आघाडीन दोन दिवसापूर्वी दिली होती, अशा सूचना दिल्यानंतर सभागृहात त्याची चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय होणे आवश्यक होते. परंतु सत्तारूढ काँग्रेस आघाडीने काल पत्रक प्रसिद्धीस देवून सदर सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज प्रशासनाने भाजपा ताराराणी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सभा होणार नसल्याचे दूरध्वनी वरून कळवले. परंतु अचानकपणे महापौर एकट्याच सभागृहात गेल्या व त्यांनी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करून सभा तहकूब करीत असल्याचे जाहीर केले. हा प्रकार म्हणजे सत्ताधारी काँग्रेस आघाडीचे अज्ञान प्रकट करणारी आणि सत्ताधारी असूनही त्यांचा पळपुटेपणा सिद्ध करणारी घटना आहे. अशी टीका मराठा आरक्षण विषयी एकाही काँग्रेस सरकारला कायदा करता करता आला नाही.

आला नाही. पण भाजपने ते काम केले, हे सामान्य जनतेला माहित आहे. भाजप सरकारने कायदा करून उच्च न्यायालयात पूर्ण ताकदीनिशी लढाई लढून तो टिकवला. त्याउलट महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा मिळू नये या त्यांच्या मूळ योजनेप्रमाणे त्यांनी मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळू दिली. हे नाकर्तेपण झाकण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारवर आदावत घेत आहेत, परंतु मराठा आरक्षणाच्या स्थगिती मिळालेल्या कायद्याबाबत जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती राज्य सरकारनेच करायची आहे ना की केंद्र सरकारने हे ही सामान्य जनतेला माहित असल्याचे भाजप आणि ताराराणी नगरसेवकांनी पत्रकात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER