मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मंदीरांबबातच वेळकाढूपणाचे धोरण का ॽ ; खासदार सुजय विखेंचा सवाल

Sujay Vikhe Patil

मुंबई : राज्यातील मंदिरं खुली करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील भाजपानं (BJP) शनिवारी ‘दार उघड उध्दवा दार उघड’ या आंदोलनाला सुरुवात केली. भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या नेतृत्वात शिर्डीतून आंदोलनाला सुरुवात झाली आहे .

ही बातमी पण वाचा:- दार उघड उद्धवा दार उघड’, राज्यभरातील मंदिरांसमोर भाजपच्या आंदोलनाला सुरुवात

ज्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली मात्र मंदीर उघण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील पाच महीन्यांपासून बंद आहेत. शिर्डी येथील साईबाबांचे मंदीर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली मंदीर सुरू करण्यात राज्य सरकार दिरंगाई का करते ? , दारूच्या दुकानापासून ते मॉल उघण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात, मग मंदीरांबबातच वेळकाढूपणाचे धोरण का ॽअसा सवाल उपस्थित करत सुजय विखे पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER