मेधा कुलकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Chandrakant Patil & Megha Kulkarni

कोथरुडच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी (Megha Kulkarni) यांच्या सहजानंद सोसायटी येथील निवासस्थानातील जनसंपर्क कार्यालयाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मेधाताईंचे अभिनंदन केले.

यावेळी कोथरुडचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, संघटन सरचिटणीस सचिन पाषाणकर, पुणे शहर भाजपा चिटणीस अनिता तलाठी, रिपाइं (आ.) चे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, यांच्यासह भागातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते मेधाताईंच्या कन्या वास्तुविशारद कल्याणी कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER