भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, शेतकरी कर्जमाफी म्हणजे नाचता येईना….

CM Uddhhav Thackeray And Chandrakant Patil

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. महापलिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवसभर बैठका आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले महापालिका निवडणुकीत ताकद लावली तर आम्हाला संधी आहे. म्हणून शहरात आलाे, बैठका घेत आहे. शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी स्थिती आहे. ही फक्त घोषणा आहे, मनापासून नाही. आता म्हणतात, ग्रामपंचायत निवडणुक आचारसंहितेमुळे यादी जाहिर करता येणार नाही. मग जे कायदे या अठव‌ड्यात केले, ते सगळे रद्द करा. सरपंच निवड कायदा, बाजारसमिती निवडणुक कायदा हे सगळे कायदे रद्द करावे. आम्ही राज्यपालांना निवेदन दिले. असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तांत्रिक अडचणी दूर करून शहराचं नाव बदला
पुढे पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत आम्ही विजय मिळवणारच सांगत शहराचं नाव संभाजीनगर व्हायला हवं, आपण सगळे शिवजी महाराज यांचे वंशज आहोत, आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, त्यामुळं तांत्रिक अडचणी दूर करून नाव बदलायला हवं असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. पाथर्डी येथील शेतकरी आत्महत्या दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्यांना मदत करायला हवी, आमच्या सरकारने केलं. जोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, भाववाढ मिळणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केल

आता मात्र हे सगळं विस्कळीत झालंय
गंगापूर मध्ये छेडछाडीच्या घटना झाल्या. हे प्रकार वाढतच आहेत. आमच्या सरकारने भरपूर काम केलं, मात्र आता हे सगळ विस्कळीत झालं आहे. कायद्याचा धाक उरला नाहीये, गुंड बिळातून बाहेर पडले आहेत. आम्ही उध्वजींना म्हटले की, गृहखाते तुमच्याकडे ठेवा, मात्र कुणालाच इंटरेस्ट नाही, असं चित्र असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.