कुणाचाही ‘बाप’ काढला नाही; चंद्रकांत पाटलांची सारवासारव

Chandrakant Patil

मुंबई : पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना “आम्ही तुमचे बाप आहोत !” असे म्हणाले होते. पाटील यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून त्यांच्यावर  टीका करण्यात आली .

यानंतर आता ‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द असून कुणाचाही ‘बाप’ काढला नाही, असे  पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी “बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही. ” अशी सारवासारव केली आहे. तसेच हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय? असंदेखील म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली.

यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच आपल्या विधानावरही त्यांनी खुलासा केला आहे. “मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. त्यापैकी बाप हासुद्धा एक शब्द आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत, असं मी म्हणालो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?” असंदेखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER