कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून मुख्यमंत्र्यांनी राज्याची प्रतिमा धुळीला मिळवली- चंद्रकांत पाटील

CM Uddhav Thackeray-Chandrakant Patil

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या घटनेवर भाष्य केले .

एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला हे समजण्यापलीकडचं असल्याचा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो; परंतु इथं उद्योगपतींच्या घातपाताची आणि समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचं समर्थन शिवसेना करत होती, अशी टीकाही चंद्रकांतदादांनी केली. ‘मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचं समर्थन का केलं जात होतं? असा सवाल करतानाच नक्की कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले? असेही पाटील यांनी विचारले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER