भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची खासदारकी धोक्यात

Dr Jayadheswara Mahaswami

सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ‘बेडा जंगम’ या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी पूर्ण झाली असून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याच्यावतीने दाखल केलेले म्हणणे फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

माहितीनुसार , सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार तथा गौडगावच्या वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या दोघा दिग्गजांना पराभूत केले होते. निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यास आक्षेप घेत विनायक कंदकुरे, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड व मिलिंद मुळे या तिघांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्राची पडताळणी होऊन तक्रारदारांच्या आक्षेपावर सुनावणी झाली.

भाजपा नेत्यानं पुष्पहार घातल्याने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण