रस्त्यावरच्या खड्ड्यांचा सेल्फी घेण्याचा सुप्रियाताईंना विसर; भाजप नेत्याचा टोला

supriya-sule over take-selfie-with road

वैजापूर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच औरंगाबाद येथे आल्या असता त्यांनी वैजापूर येथील चिंतन बैठकीला हजेरी लावली होती. वैजापूर येथे राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता. वैजापूरला येताना सुप्रियाताईंना रस्त्यावरचे खड्डे दिसले नाही का, असा सवाल भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.

भाजप सरकारच्या काळात ऊठसूट रस्त्यावरच्या खड्ड्यांचा सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता रस्त्यावरील खड्ड्यांचा सेल्फी का नाही घेतला? त्यांच्या मोबाईलची बॅटरी संपली होती की, असा खोचक प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसेच सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वात आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शिवसेनेने जनाधाराचा अवमान करून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे. तीन पक्षांची महाविकास आघाडी नसून महाराष्ट्र भकास आघाडी असल्याची टीका दांगोडे यांनी केली. त्यांनी कर्जमाफीवरूनदेखील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपा आक्रमक


Web Title : BJP slams supriya sule over take selfie with road

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Aurangabad City, Nagpur City, Thane City, Pune City, Mumbai City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)