एकनाथ खडसेंनी केलेल्या ‘उद्योगां’चा विचार करावा, भाजपाचा टोमणा

Eknath Khadse-Prasad Lad

मुंबई : एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजपावर आरोप करताना स्वतः काय उद्योग केले होते त्याचा विचार करावा. खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चूक आहेत. भाजपावर आरोप करण्यापेक्षा एकनाथ खडसेंनी आत्मचिंतन करावे, असा टोमणा भाजपाचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी खडसेंना मारला.

लाड म्हणालेत, एखाद्याची स्वप्न जर त्याच्या त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला आपण आळा घालू शकत नाही.

राष्टवादी काँग्रेसला (NCP) टोमणा मारताना ते म्हणालेत, कुणावरही आरोप करणे सोपे असते पण ते सिद्ध करणे कठीण असते. फक्त भाजपा किंवा भाजपाच्या नेतृत्त्वावर आरोप करण्यासाठी राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंचा वापर होऊ नये. एकनाथ खडसेंचा उपयोग राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या विकासासाठी करावा. एकाधिकारशाही काय असते ते देखील खडसेंना राष्ट्रवादीत चांगले कळेल.

एकनाथ खडसेंना मंत्रीपद मिळावे; फक्त भाजपावर आरोप करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीने पक्षात घेतलं असे होऊ नये असेही प्रसाद लाड म्हणालेत. भाजपावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आपण स्वतः काय उद्योग केले आहेत त्याचाही विचार करावा असा टोमणा प्रसाद लाड यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER