औरंगाबादचे संभाजीनगर बाळासाहेबांनी केले हे भाजपवाल्यानी विसरू नये – संजय राऊत

Balasaheb Thackeray - Sambhajinagar - Sanjay Raut

नाशिक :- सध्या औरंगाबाद (Aurangabad) नामांतराचा वाद अधिकच रंगला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) नामांतरां व्हावे अशी आग्रही भूमिका भाजपने (BJP) घेतली आहे. यासाठी भाजप शिवसेनेला (Shiv Sena) टार्गेट करताना दिसून येत आहे. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नाशिकमध्येघेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनिल बागुल (Sunil Bagul) यांनासोबतच ते घेऊन आले होते. पत्रकार परिषदेतच दोन्ही नेत्यांना भगवी शाल देऊन संजय राऊत यांनी पक्षात स्वागत केले आहे.

‘वसंत गीते आणि सुनिल बागुल हे इथं माझ्यासोबत आले आहे, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. आता दोन्ही नेते मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहे. त्यानंतर त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. नाशिकचा बालेकिल्ला आता आणखी भक्कम केला जाणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

नाशकात हा काही मास्टर प्लॅन नव्हता. प्रवाह बदलत आहे. पुढे काय बदल होणार आहे ते वसंत गीते आणि बागुल सांगतील. पण, आता शोभा मगर, प्रकाश डायमा हे सेनेत प्रवेश करणार आहे. अनेक भाजपचे पदाधिकारी, प्रमुख नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, त्यांना शिवसेनेसोबत काम करायचे आहे. या दोन्ही नेत्यांपाठोपाठ भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहे, असंही राऊत यांनी सांगितले. तसंच ‘पुढचा महापौर हा शिवसेनेचा असणार आहे’, असंही राऊत यांनी ठामपणे सांगितले.

औरंगाबाद विमानतळ नाव बदलण्याचा ठराव कॅबिनेटनं मंजूर करून केंद्राला पाठवला. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ हा प्रस्ताव सरकारने दिला आहे. संभाजीनगर हे संभाजीनगरच राहणार आहेत. काँग्रेस विरोध करत असले तरी ते मनातून शिवाजी महाराजांचेच भक्त आहेत. औरंगजेबाजे नाही. काँग्रेस मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक आहे. संभाजीनगर आज जे आपण बोलतो आहोत ते बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) केलेलं संभाजीनगर आहे, हे भाजपवाल्यांनी विसरु नये. भाजपावाल्यानी आधी बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर करावं अशी मागणी आम्ही करत आहो. यावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी. किमान समान कार्यक्रमावर लोकभावनेवर निर्णय घ्यायचा नाही, असं नाही, असंही राऊत म्हणाले.

तसंच, माझ्यावर कोणताही घाव,वार, हल्ला याचा परिणाम होत नाही. नोटिसा म्हणजे सरकारी कागद आहे. आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल. ईडी आणि सीबीआय मागे लावण्याऱ्यांनी लक्ष्यात ठेवावं. मी विरोधी पक्षांचा सन्मान राखतो. प्रताप सरनाईक यांना वेगळा न्याय आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना वेगळा का? असा सवालही राऊत यांनी केला.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न असेल, बऱ्याच ठिकाणी हे ऐक्य राखण्यात आम्हाला यश मिळेल. राज्यपाल नियुक्त आमदार, या नियुक्त्या न होण हा विधिमंडळाचा अपमान, हे घटनेचे मारेकरी, राज्यपालांनी स्पष्ट करावं, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : नाशिक शिवसेनेचा अभेद्य गड होणार, पुढचा महापौरही शिवसेनेचाच असेल; संजय राऊतांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER