एखाद्या विजयामुळे हुरळून जाऊ नये; सतेज पाटलांची भाजपवर टीका

Satej Patil warns Karnataka government

कोल्हापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंढरपूरसाठी इच्छुक अधिक होते, त्यांची सांगड घालून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. भाजपने एखाद्या विजयामुळे हुरळून जाऊ नये. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी म्हणून लढलेल्या निवडणुका आम्ही जिंकल्या आहेत, अशी टीका सतेज पाटील (Satej Patil) यांनी भाजपवर केली आहे.

पंढरपूर- मंगळवेढा निवडणुकीबद्दल सतेज पाटील म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला किती मते मिळाली हे पाहावे लागेल. आगामी काळात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत राहावे, अशी इच्छा आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांचे नाव कोणामुळे अडकले आहे, हे सर्वांना माहीत आहे. भाजपला मदत होईल, अशी भूमिका राजू शेट्टी घेणार नाहीत, असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

भाजपविरोधात लाट
“भाजपच्या विरोधात लाट आहे, हे विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून दिसत आहे. कोरोना परिस्थितीचा सामना करताना केंद्राने दुजाभाव केला. निवडणुकीमुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष केले, याचा हा परिणाम आहे. गेल्या काही वर्षांत सात राज्ये भाजपच्या हातातून गेली आहेत. लाखोंच्या सभा घेतल्या म्हणजे लोक मत देतात असे नाही. सामान्य माणसाला कोणतीही मदत केली नाही, याची चपराक भाजपला बसली आहे. इथून पुढे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या बाजूने कौल राहील याची मला खात्री आहे.” असेदेखील पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button