सचिन वाझेचे पत्र भाजपने दिलेले असावे : हसन मुश्रीफ

Maharashtra Today

मुंबई :- “निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने लिहिलेले पत्र हे भाजपने दिले असावे, असे माझे म्हणणे आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले होते, आणखी एक मंत्री राजीनामा देईल.” असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले. आज हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) आणि महाविकास आघाडीवर झालेल्या आरोपांना उत्तर दिले. हसन मुश्रीफ म्हणाले की, “अनिल परब यांनी आपल्या दोन मुलींची शपथसुद्धा घेतली. भाजपने यातून बोध घेणे गरजेचे आहे. राफेल भ्रष्टाचार आपण थांबवला, कोणतीही चौकशी करू दिली नाही. मात्र, इतर देशांच्या पेपरमध्ये हा विषय आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले होते की, ‘आणखी एक मंत्री राजीनामा देईल.’ त्यांचे वक्तव्य आणि सचिन वाझेचे पत्र हा निश्चितच योगायोग नाही. वाझेचे पत्र हे भाजपने दिलेले पत्र असावे, असे मला वाटते, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. “सचिन वाझेला विरोध असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली.

वाझे हा परमबीर सिंग यांनाच रिपोर्ट करत होता. वाझे ऑफिसला येताना BMW आणि मर्सिडिजने येत होता, तर कारवाई का केली नाही? तुरुंगातून पत्र लिहिणे हे योग्य नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावेल.” असे म्हणत कामगार विभागाचा मी कालच कार्यभार स्वीकारला. कामगारांचे प्रश्न आहेत. कामगारांनी कोणत्याही राज्यात जाऊ नये. आम्ही त्यांची व्यवस्था करू, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.

ही बातमी पण वाचा : वाझेंच्या पत्रातील आरोप गंभीर, ‘दूध का दूध, पानी का पानी’ व्हावे  :   फडणवीसांकडून सीबीआय चौकशीची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button