टीका सारण्यासाठी भाजपाला ‘भारतरत्न’ मिळाला पाहिजे – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) नव्या विषाणूचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लागू केलेल्या ‘संचारबंदी’वर भाजपने टीका केल्याबद्दल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोमणा मारला मारला, टीका करण्यासाठी भाजपाला (BJP) भारतरत्न दिला पाहिजे.

पत्रपरिषदेत ते उपरोधाने म्हणालेत, भाजपाचे अभ्यासू नेते कुठल्याही विषयावर अमर्याद टीका करु शकतात त्यासाठी त्यांना आता भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. काही लोकांना पीएचडीची पदवी दिली पाहिजे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजपासून रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. यावरुन भाजपाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर संजय राऊत म्हणालेत, लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये काय चालले आहे पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे बऱ्याच महिन्यांमध्ये परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे जगात काय सुरु आहे ते कदाचित भाजपाच्या नेत्यांना माहीत नसावे. केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी का घातली आहे हे कारण जरा अभ्यासू नेत्यांनी तपासावे.

तीन पक्ष एकत्र कधी लढतील मी वाट बघतो आहे. आम्ही लढायला तयार आहोत असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. त्याबद्दल संजय राऊत म्हणालेत, विधानपरिषद पदवीधर निवडणुकीत आम्ही एक छोटी लढाई केली आणि जिंकलो. या निवडणुकीत तीन पक्ष एकत्रच होते. त्यामुळे पुढेही ते एकत्रच असतील.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते दाखल : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER