बुलडाण्यात भाजप-शिवसेना वाद चिघळला; भाजप आमदार कुटेंच्या गाडीची तोडफोड

BJP - Shiv Sena - Sanjay Kute

बुलडाणा : शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर बुलडाण्यात शिवसेना आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगला होता. मात्र आता हा वाद आणखीनच चिघळला आहे. भाजपचे आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून हा हल्ला सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे.

‘मला जर कोरोनाचे (Corona) जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातच कोंबले असते.’ अशी विखारी टीका संजय गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर बुलडाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला होता. संजय गायकवाड यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज संजय कुटे बुलडाण्यात आले होते. पण, अज्ञात व्यक्तींनी कुटे यांच्या गाडीवर हल्ला चढवला आणि गाडीच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर संतप्त झालेले कुटे यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. संजय गायकवाड यांच्याच समर्थकांनी आपल्या गाडीच्या काचा फोडल्या असल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे.

दरम्यान, ‘माझ्या गाडीवर बुलडाणा येथे संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. आता मी संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बुलडाणा शहर सोडणार नाही. मी परत बुलडाणा शहरात येतोय. हिंमत असेल तर मला अडवून दाखवावे.’ असे आव्हान कुटे यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button