‘पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तानसोबत टक्केवारी?’ आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

Ashish Shelar-Uddhav Thackeray

मुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मारहाणप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai police) शुक्रवारी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये शिवसेनेचा (Shivsena) शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून भाजपने (BJP) शिवसेनेवर निशाणा साधला.

“कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री… टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगनाचे घर तोडलेत… आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!! पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तानसोबत टक्केवारी?” असे ट्विट शेलार (Ashish Shelar) यांनी केले आहे.

दरम्यान निवृत्त नौदल अधिकाऱ्याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करणारं एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे . अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख कमलेश कदम आणि कार्यकर्ता संजय मांजरे यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER