भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू

Sharad Pawar and Eknath Khadse

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्वपक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे . राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात बैठक सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील नेता पक्षात घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीला गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील हेदेखील उपस्थित आहेत. या नेत्याच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांची काय भूमिका आहे, पक्षातील प्रमुख नेत्यांचं काय म्हणणं आहे, याबाबत या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे . उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्या नावाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे .

दरम्यान काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष सोडण्यास त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे. त्यामुळे खडसेंकडून पक्ष सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर भाजपच्या अंतर्गत वादातून एकनाथ खडसेंना गुंतवलं गेलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती, हे विशेष. त्यामुळे एकनाथ खडसेच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर नाहीत ना, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

तसेच जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं फायद्याचे ठरू शकते . हे विशेष .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER