सांगलीत भाजपची घोडदौड

BJP

सांगली : सांगलीत भाजपची (BJP) घोडदौड कायम राहिली. जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत चारही पक्षांना संमिश्र यश मिळाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी बाजी मारत प्रत्येकी 37 गावांत सत्ता मिळवली. भाजपला 27, शिवसेनाला 16 तर स्थानिक आघाड्यांना 35 गावांत सत्ता मिळाली. दरम्यान, निकालानंतर विजयी झालेले पॅनेलप्रमुख आणि उमेदवार यांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण केली. फटाक्यांची आतषबाजी करीत अनेक गावांत मिरवणूकही काढण्यात आली. जिल्ह्यात 152 पैकी 10 गावांत बिनविरोध निवडणूक झाली . त्यानंतर 142 ग्रामपंचायतींमधील 551 प्रभागांमधील 1 हजार 508 जागांसाठी 5 हजार 65 उमेदवार मैदानात होते.

मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकाल कोणता लागणार, सत्ता पुन्हा येणार की परिवर्तन होणार या विचाराने नेते आणि उमेदवारांची धाकधूक वाढलेली होती.

मतमोजणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी सकाळपासून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तासगाव, जत, मिरज या तालुक्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अधिक होती. लक्षवेधी ठरलेल्या तासगाव तालुक्यात 39 पैकी 21 गावांत आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सत्ता मिळाली. खासदार संजय पाटील यांच्या गटास 9 ठिकाणी तर स्थानिक आघाड्यांना 9 ठिकाणी सत्ता मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER